अलोक आपली प्रतिक्रिया थेट हृदयास भिडली. पटेल, गांधी , शास्त्री यांसारख्या महापुरुषांची आजही उणीव भासते आहे, पुढेही भासत राहणार यांत काडीची पण शंका नाही (आजचे राजकीय नेतृत्व बघता.. ) पवारांविषयी मला खूप कळवळा आहे असे मुळीच नाही पण आवश्यक तेवढा आदर आहे, त्याच्यासाठीच नाही तर, मनमोहनसिंग, सोनिया गांधी किंवा महाजन असो नाहीतर फर्नांडिस हे पण मी आदरार्थी मानतो. पण मला मांडायचा विचार थोडा वेगळा होता (मांडता आला नाही तो भाग निराळा.. ) सांगायचे असे की, मेडियाने केलेला आरोप हा लांडगा आला रे आला या गोष्टीप्रमाणे ठरत आला आहे. काहीही असो आरोप खरंच गंभीर होते यांत वाद नाही, पवारच का अश्या वादात सापडतात हे पण खरे आहे, पवार अशां मुद्द्यांवर बोलायचे टाळतात हे मी स्वतः बघितलेले आहे (संदर्भ - टी व्ही वरील काही मुलाखती) परंतु पवार दोषी आहेत असे कुठेही ठळकपणे पुढे आलेले नाही. (पवारांनी पुराव्यांवर बोळा फिरविला, ही विचार बळावण्यास खूप वाव आहे) पण सरतेशेवटी पवारसाहेब या सर्वांवर मात करून पुढे जातच आहेत, नवीन शिखरे पादाक्रांत करीतच आहेत...फिरकी गोलंदाज मुरलीधरनप्रमाणे.