सेनादलातील बाकीच्या योग्य परंपरांचा दाखला येथे देऊन मूळ मुद्दा दुर्लक्षिला गेला आहे असे वाटते. मुळात सचिनला हुद्दा दिला म्हणून कोणी हुतात्मा होण्याच्या तयारीने सेनादलाकडे आकर्षित होईल हे गृहितच चुकीचे आहे. उद्या राजकारणात चांगले लोक यावेत म्हणून ऑनररी गृहमंत्री ऑनररी पंतप्रधान अशा पदव्या देणार काय? न्यायक्षेत्रात चांगले लोक यावेत म्हणून त्याला न्यायाधीश करणार काय? कपिलदेवला दिलेल्या पदवीचा पायंडाच चुकीचा आहे.
क्रीडा क्षेत्रातील कामगिरी इतर संबंध नसलेल्या क्षेत्रात सवंगपणाने लक्षात घेऊ नये. त्यासाठी पद्म पुरस्कार वापरले जातात त्याबद्दल आमची तक्रार नाहीच.