हा विषय आता फार बोथट होत चालला आहे. खरे तर, सर्वच समाजात हे शोषण चाललेले दिसते. नशीब आपले, इथे कुणी तरी वाचा फोडणारे निघतात. त्याची निष्पत्ती समाधानकारक नसते याला मुख्य कारण दिसते ते संवेदनशीलतेचा अभाव किंवा निगरगट्टपणा,  तोही शासन स्तरावरचा. त्यामुळे धाक राहिलेलाच नाही.  समाजधुरीण काय किंवा पोलिस काय,  त्यांनी शाब्दिक कायद्याचा तराफा घेऊन तरताना नीती विसरून चालणार नाही हा एक भाग आणि स्त्रीचं चरित्र अनाकलनीय असतं हा दुसरा भाग.

शेवटी, पाण्यात उडी घेऊन जिवाची पर्वा न करता बुडत्याला वाचवणारा विरळाच असतो ! सध्याच्या परिस्थितीत तरी श्रावणजी, आपण निर्देशित केलेल्या डॉक्युमेण्टरीप्रमाणे कितीही माहितीपट आले तरी ते वांझोटे ठरतील.