मुळात सचिनला हुद्दा दिला म्हणून कोणी हुतात्मा होण्याच्या तयारीने सेनादलाकडे आकर्षित होईल हे गृहितच चुकीचे आहे. हें विधानच न पटण्यासारखें आहे. सेनादलांत कोणीही भर्ती होतो तो युद्ध जिंकायला. हुतात्मा व्हायला नव्हे. सेनादलांत दरवर्षीं कितीजण भर्ती होतात आणि त्यापैकीं किती टक्के शहीद होतात?सचीनसारख्याला हुद्दा दिला म्हणून सेनादलाकडे कोणी आकर्षित होणार नाही हें मत कोणत्याही माहितीवर आधारित नसावें. नाहींतर विविध जाहिरातींत कोणी सचीनला वा अन्य लोकप्रिय खेळाडूला घेतलें नसतेंच. लोकप्रिय खेळाडूंकडे तरूण आकर्षित होऊन त्यांचें अनुकरण करतातच. बेकहॅमची वा धोनीची केशरचना हें याचें उत्तम उदाहरण आहे.सुधीर कांदळकर