ह्या गझलेतील क्रियापदांच्या वापरावर हिंदीची गडद छाया दिसते.
"... कळून आली" = 'समझ आयी'. मराठीत कळली, समजली असे म्हटले जाते.
"...ती का जळून आली?" - इथे वातीला तिच्या कुठेतरी जाऊन जळून येण्याचे  (खेळून अथवा भांडून आल्याप्रमाणे) कारण विचारायचे असल्यास हा वापर ठीक आहे, अन्यथा आक्षेप वरीलप्रमाणेच.
"...गात्रे गळून आली" - मराठीत गात्रे फुलून आली असे जरी म्हणत असलो तरी त्याच्या विरुद्ध अर्थाने गात्रे गळली/गळून गेली असे म्हणतो, गळून आली असे नाही.

मक्ता आवडला.