कोणताही राजकारणी राजकारणात उतरतो तोच मुळी यश संपादन करण्यासाठीच यश संपादन नाही केल तर तो राजकारणी काय?
शरदरावांच्या आस्थापन कौशल्या बाबत कोणाचे दुमत असणार? पण मला एक सांगा त्यांनी एक नेता म्हणून असा कोणता आदर्श
समाजापुढे ठेवला की त्याचा आम्ही सर्वांनी आदर करायला हवा . हे लोकप्रीय निर्णय त्यांनी घेतले असतील कींवा त्यांच्या कार्यकालात
घेतले असतील पण म्हणून ....... हा एक मान्य शरदरावांनी आर आर पाटील सारखा माणुस महाराष्ट्राला मिळवून दिला त्या बद्दल
महाराष्ट्र त्यांचे आभारच मानेल , जो व्यक्ती स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहिला नाही अश्या माणसाचा काय भरवसा द्यावयाचा आणि
काय आदर्श घ्यायचा. मला तरी वाटत राजकारणी म्हणूण मोठा झाला पण नेता म्हणून छोटाच राहिला . असो...
आज आंम्ही जी आमचे मत मांडतोय ते मांडण्याचा ( भांडण्याचा नव्हे! ) घटनेनी अधिकार दिला आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे
कार्यक्षेत्र वेगळे असते आज ह्याच्या विषयी मत मांडायचय तर त्याची उंची गाठा उद्या त्याच्या उंचीची तयारी करा ह्यातच सर्व आयुष्य गेल्यावर
कार्य केंव्हा करणार? .....