'कळून येणे' ही वाक्यरचना, मला वाटते बरोबर आहे. हे वाक्य सकारात्मक आहे. अर्थ असा की, या पूर्वी माझा कुठलाही समज-गैरसमज नव्हता, माझे या विषयावर कुठलेही मत नव्हते, असे असताना मला सहज समजले की...
उदाहरणार्थ: त्याला भेटल्यावर मला कळून आले की तो महाराष्ट्रीय आहे. हिंदीत मैं समझ गया था कि.. वगैरे. इंग्रजीत ऍज आय् अंडरस्टुड दॅट..
'मला कळून चुकले की' या वाक्यातला पुढचा वाक्यांश साक्षात्काराचा हिस्सा असतो. मला वाटत होते की ती अमुकतमुक आहे, पण मला आज कळून चुकले की ती खरोखरी ती नव्हती. मैं समझ गयी की.. इंग्रजीत आय रिअलाइझ्ड दॅट..
चूभूद्याघ्या.