"शरद पवार विनाकारण.... " ह्या चर्चेस आपण सर्वांनी रंगत आणली, त्यांकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद..! चर्चा पुढे चालू राहीलच पण रंगेल की नाही हे सांगता येणार नाही. पवार विविध कारणांनी वादग्रस्त राहिले आहेत , मेडियानेच त्यांना वादग्रस्त केले आहे असे नाही, असे मत बऱ्याच जणांनी व्यक्त केले आहे, तर काहींनी माझ्याशी सहमती दाखवली आहे. तरीपण या चर्चेशेवटी मला असे वाटते की टाळण्याजोगे वाद टाळता येत असताना पवारांनी ते वाद चिघळत ठेवले आणि मेडियाला आयतेच कोलीत दिले. पण अलोक म्हणाले त्याप्रमाणे संवैधानीक किंवा न्यायालयीन व्यवस्था दुबळी असल्यानेच पवारांचे (आणि त्यांच्यासारख्या नेत्यांचे)फावते, हे खरे असेल तर संबंधित व्यवस्था सबळ करून सत्य समोर आणणे हे कोण करेल ...?आपण , मेडिया की सरकार? तूर्तास एवढेच .... पुन्हा भेटूच...धन्यवाद..!