सध्या मौंज किंवा मुंज करणारे हौस म्हणूनच करतात. त्यामुळे न करणारांनी आपण काही फार सुधारणावादी आहोत किंवा करणारांनी आपण काही अनावश्यक गोष्ट करत आहोत असे मनात बाळगण्याचे काही कारण नाही. बारसे तरी करण्याचा काय फायदा आहे ? अमेरिकेत व इतरही काही देशात जन्मतः च मुला/मुलीचे नाव नोंदवावे लागते, मग नंतर बारसे करून समारंभ करण्याचे काय प्रयोजन ? केवळ हौसच . तीच गोष्ट वास्तुशांतीसारख्या कार्यक्रमाची ! लग्नही साधे नोंदणी पद्धतीने केले तरीही ते गाजावाजा करून केलेल्या लग्नाइतकेच टिकणार . थोडक्यात हौस म्हणून करावयाच्या गोष्टी ज्याना हौस असेल त्यानी कराव्या.त्यानिमित्ताने नातेवाईक इष्टमित्र वगैरेना बोलवावे व आनंद वाटून घ्यावा.