कविता लिहीतांना तुम्हाला शब्द सुचतात आठवावे लागत नाहीत. ज्या क्षणी आपण आठवण्याचा, मूड ऐवजी विचारांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कविता विस्कळीत होते.

मला वाटतं की कवितेचा एक मूड असतो, त्या मूड मध्ये ती जमली तर जमते नाही तर सोडून द्यावी लागते. वेगवेगळ्या कडव्यात वेगवेगळे आशय व्यक्त केल्यानी मूडचा एकसंधपणा किंवा कवितेचा इंपॅक्ट हरवतो.

अशोक पत्कींना मी मागे भेटलो तेव्हा विचारलं की तुम्हाला चाल कशी सुचते तर ते म्हणाले की 'ते सर्दी कशी होते विचारण्या सारखं आहे! पण तुम्हाला एक सांगतो की हायटेंपरवाल्या माणसाला (चटकन राग येणाऱ्याला) चाल सुचणार नाही'.  मला वाटतं सुचायला तुमचा मूड लाईट हवा असा त्याचा अर्थ आहे. 

संजय