विप्रुद्दीन, तुमच्या प्रतिक्रियेचा अर्थ मला नीट समजला नाही.
माझ्या समजुतीप्रमाणे मी (भोलानाथ) म्हणजे माओ आणि मी सुरू केलेल्या चर्चेस प्रतिक्रिया देणारे म्हणजे बुद्धीवादी.. असे तुम्हाला सूचीत करायचे आहे का?खरं तर ही चर्चा सुरू करण्यामागे पवारांच्या वादग्रस्त होण्याने आपणा सर्वांची मते मला जाणून घ्यायची होती. पवार वादग्रस्त आहेत की केले जात आहेत हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली होती, त्यासाठी मी पवारांच कसे निर्दोष आहेत असे मांडण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांमुळे मला विरुद्ध मते पण समजली. कुणावर बौद्धिक, वैचारिक कुरघोडी करण्याचे प्रयोजन मुळीच नव्हते.मला वाटते कुणीही निर्बुद्ध नाही आणि असले तरीही खंत करण्याची तशीही आवश्यकता नाही...धन्यवाद..!