आपणा सर्वांचेच प्रतिसादाबद्दल आभार. हा सगळा प्रपंच करण्याचं कारण इतकच आहे की आपण लोकलमध्ये बसतो किंवा उभे राहतो
तेव्हा दुसऱ्या माणसालाही आपल्या सारखी आणि आपल्या इतकीच प्रवासाची गरज आहे याची जाणीव निर्माण व्हावी. हल्ली आर्थिक
परिस्थिती बहुतेकांची पूर्वीपेक्षा बरी असावी असे वाटते. त्यामुळे दुसऱ्या वर्गातून जाण्याचा कल कदाचित कमी झाला असावा. पण
ज्यांना आयुष्यभर दुसऱ्या वर्गाशिवाय लोकल प्रवास करता आला नाही , त्यांचे दुःख तरी इतराना समजेल. आजकाल तर रिक्षा, टॅक्सी व
बसमध्येही असे प्रकार चालत असल्याचा अनुभव आला आहे. यातून कोणतीही सुधारणा अपेक्षित नाही पण आत्मपरीक्षण जरी करावेसे वाटले
तरी लेखाचा हेतू साध्य झाला असे वाटेल. मराठी माणसांनी तर एकत्र येण्याची फारच गरज आहे. पण आपल्या डोक्यातून जात (निदान घराबाहेर
तरी) जाईल तेव्हाच काहीतरी होईल असं मनापासून वाटतं. असो. प्रतिसादाबद्दल सर्वांचेच पुन्हा एकदा आभार.