उगीच जुन्या पध्धतिची नावे वापरून वातावरण निर्मीती करायचा केविलवाणा प्रयत्न आहे.

या विधानाशी पूर्णपणे असहमत आहे. ( अर्थात तुमचे मत तुमच्यापाशी माझे माझ्यापाशी या उक्तीला धरुन मत मांडत आहे) 

शशी भागवत यांना "मर्मभेदकार" ही बिरुदावली  एका गाजलेल्या साहित्यिकाने दिलेली आहे. (दुर्दैवाने आठवत नाही नाव)
गों. ना. दातार यांच्या सर्व कादंबऱ्या अत्भुत आहेत यात शंका नाही. पण मर्मभेदकार  आणि दातार यांच्या कादंबऱ्यांत एक फरक आहे. गोंआ. दातारांच्या कादंबऱ्यांचा मूळ ढाचा रेनॉल्डसच्या कादंबऱ्यांवरून घेतलेला होता.   थोडक्यात सांगायचे तर विदेशी कादंबरीचा भारतीय ठेवणीत केलेला अनुवाद होता.  पण शशी भागवतांच्या कादंबऱ्या या त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झाल्या आहेत. किमान मला तरी त्यांचे लेखन आवडले. केवळ मीच नाही तर अनेक लोकांना मर्मभेदने वीरधवल अथवा दातारांच्या अन्य कादंबऱ्यांइतकाच आनंद दिला आहे.  

तुम्हाला वैयक्तीक रित्या त्यांच्या कादंबऱ्या केविलवाण्या कोणत्या बेसवर वाटल्या ते जाणून घ्यायला आवडेल. किमान मर्मभेद तरी शशी भागवतांची सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे याला येथील अनेक सन्माननीय  सदस्यांचे अनुमोदन असेन याची खात्री आहे.