खालील शब्दांसाठी प्रतिशब्द हवे आहेत -
१. अक्रीशन - accretion - अपेक्षित अर्थ असा - एखाद्या मोठ्या ख-वस्तूने गुरुत्वाकर्षणाने भोवतालातले पदार्थ (मुख्यत: वायू) गोळा केल्यामुळे वा  त्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे भोवतालातील पदार्थ त्या वस्तूला जाऊन मिळाल्याने त्या ख-वस्तूची वाढ होण्याची प्रक्रिया.
ह्या प्रक्रियेला गुरुत्वग्रहण असे म्हटल्यास अर्थबोध होऊ शकेल का?

२. प्लॅनेटेझिमल्स (planetesimals) व प्रोटोप्लॅनेट (protoplanet) - प्लॅनेटेझिमल साठी ग्रहक (अनेकवचन ग्रहके) शब्द कसा वाटतो? प्लॅनेटेझिमल्स म्हणजे ठराविक आकार नसलेले आणि १० किलोमीटरच्या आत लांबी- रुंदी- जाडी असलेले छोटे ख-गोळे. असे अनेक गोळे एकत्र येऊन, शिवाय त्यांना आजूबाजूचे पदार्थ मिळून त्यांचे प्रोटोप्लॅनेटस व ग्रह बनू शकतात. प्रोटोप्लॅनेटला बटुग्रह म्हणावे, बालग्रह म्हणावे की ग्रहिका म्हणावे? प्रोटोप्लॅनेट म्हणजे गोलाकार, सुरुवातीचा ग्रह. काही प्रोटोप्लॅनेटस एकत्र येऊन ग्रह तयार होऊ शकतो.