माझे मित्र दारू पिण्याच्या कार्यक्रमाला 'या विषयावर एकदा 'चिंतन बैठक' घेतली पाहिजे' असे म्हणतात!

तुम्ही काही चहा वगैरे घेणार का? याला उत्तर द्यावे - 'आता चहा कशाला? वगैरेच घेउ!"

काहिजण 'आज फारच उकडतंय बुवा, डिहायड्रेशन झालंय, काही तरी गार पिउया... ' म्हणतात म्हणजे बियर पिण्याचा प्रस्ताव आहे असे समजावे.

सिगारेट पिणे म्हणजे - 'जरा पेस्ट ट्रिटमेंट करून येतो (किटक नाशक मारून)'

एकदा गम्मत झाली - एका साखरपुड्याला गेलो होतो, रिवाजाप्रमाणे यजमानिण बाई म्हणाल्या "अरे, असे उभे का? बसून घ्या ना! " त्यावर मी म्हणालो "बसतो, पण घेउ काय????!!!! " मग सगळे हसल्यावर त्यांच्या लक्षात आले!!

तसेच दारुडे (दारू पिणारे) बिरुडे (बियर पिणारे) वगैरे शब्दप्रयोग आहेतच...