शब्द थोडे मागे पुढे केले तर आणखी मजा येईल
भेट आपली अशी वादळी असायची
आत आत खोल खोल वीज लखलखायची
स्पर्श केवडा तुझा, श्वास चंदनी तुझे
देह सळसळायचा अन् मिठी डसायची
सांत्वनास तू मला मी तुला असायचो
आसवे दवांमधे रात्रभर भिजायची
दिवस पाहिले असे अवस रोज व्हायची
भास्करासही आणि सावली गिळायची
हेच एक साकडे घातले मनाकडे
सोड ना आता तरी लालसा जगायची
पण कवितेचा मूड एकदम भारी !
एक नीळकंठ तर सर्व माणसांमध्ये
अंतरातली व्यथा, अंतरी जपायची
याला तोड नाही!
संजय