SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
सारासार विवेक म्हणजे काय ?दिसेल ते नासेल । आणि येइल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार । । १३-२-२ जे दिसते ते नासते ,जे येते ते जाते ,ते असार असते .तर जे सदैव असतेच ,ते सार असते ।आत्मानात्म विवेकात अनात्मा बाजूला सारून आत्मा जाणता येतो .त्यासाठी मूळारंभा पर्यंत म्हणजे मूळमाये पर्यंत जाता येते .त्यासाठी वृत्ती निवृत्त व्हावी लागते .त्यासाठी सारासार विचार करावा लागतो ।नित्यानित्य विवेक केला । आत्मा नित्यसा निवडला । ...