अरे देवा! एवढी चर्चा होऊनही आपण मूळपदाकडे परत जातोय.
मुंजीची आवश्यकता आहे, की नाही याची चर्चा कुणाशीही करायची गरजच काय? मुंज हा काही विशिष्ट जातींपुरता मर्यादित आणि जुन्या पिढीच्या समाधानासाठी करायचा उपचार उरला आहे. त्याहीपुढे तो वैयक्तिक निर्णय आहे. करा अथवा करू नका. मुंज हा संस्कार आहे. तो न केल्याने मुले मोठी व्हायची थोडीच राहतात? जुन्या गोष्टी पटत नसतील तर स्वीकारण्याचे बंधन नाही. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा किंवा अलिकडच्या काळात लग्न न करताही एकत्र राहण्याचा पर्याय उपलब्ध असताना 'वैदिक पद्धतीने विवाह करावा काय? ' या विषयावर काथ्याकूट जसा निरर्थक असतो तसेच हे.
उपनयन विधीविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा असेल तर विश्वकोष, पं. महादेवशास्त्री जोशींचा संस्कृतीकोश किंवा धर्मसिंधू ग्रंथातील माहिती वाचावी. धार्मिक कृत्ये करताना यजमानाला त्यांचा अर्थ समजावून सांगणारे वैदिक फार थोडे उरले असतील.