असेल तेवढा पैसा,  असेल तो वकूब आणि असेल तसं नशीब घेऊन या क्षणी, आता, मजेत कसं जगता येईल हे मला सांगायचं आहे.

तुम्ही म्हणता त्यात तथ्य असेल पण श्रीमंती पुढे केव्हा तरी येईल , माझं सगळं स्वारस्य आता मध्ये आहे कारण जगायला आणि भोगायला फक्त आणि सदैव एकच क्षण उपलब्ध आहे आणि तो म्हणजे हा क्षण! या क्षणात मी गरीब नाही, श्रीमंत नाही की मध्यम वर्गीय नाही कारण मी स्वतःला माझ्या सांपत्तिक स्थितीवर तोलतच नाही. मी फक्त एकच करू शकतो, समोर असलेला प्रसंग आणि उपलब्ध असलेला पैसा याचा सर्वोत्तम मेळ घालून हा क्षण मजेत घालवू शकतो.

एकदा मला हा क्षण मजेत घालवायची कला समजली की मग सगळं आयुष्यच मजेचं होतं कारण जगायला नेहेमी एकच क्षण उपलब्ध असतो आणि तो म्हणजे हा क्षण!

संजय