अयोध्येमध्ये मशी द आहे हे साधारण माणसाला माहिती होते की नाही कुणास ठाऊक.
खरंतर राजकारणी लोक या गोष्टींची आठवण मुद्दाम् करून देतात . जेणेकरून सामान्य जनजीवन विस्कळीत होईल. लोकही
अशा गोष्टीत भडकतात. पण दुर्लक्ष करीत नाहीत. न्यायालयाचा निर्णय काहीही लागो आपण न भडकणं बरं. आपल्या जीवनात इतर
पुष्कळ गोष्टी महत्त्वाच्या असतात. लोक जर उदासीन राहिले असते तर बरं झालं असतं. पण ते नको तिथे उदासीन असतात़. उदा.
ग्राहक हक्क व इतर अन्याय. तसं पाहिलं तर असे वाद भारतातल्या बऱ्याच जागांबद्दल व्हायला हवेत. पण आपल्याला त्या बाबत
माहिती नसते. राजकारणी बरोबर हेच हेरत असतात. आता अयोध्या प्रकरण होईल. मग दुसरं काही तरी काढतील. आपण किती
महत्त्व द्यायचं हे समाजाच्या झालेल्या मानसिक प्रगतीवर अवलंबून आहे. न्यायालयीन निर्णयावर टीका टिप्पणी करणं हे तथाकथित
समाज हितचिंतकांचं काम आहे . तेच असल्या गोष्टींना खतपाणी घालतात. अर्थातच, आता आपण बघण्याशिवाय काहीही करू शकत
नाही. असं मला एक सामान्य माणूस म्हणून वाटतं.