प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:

रात्रीचे ११:०० वाजले होते. मी नेहमी प्रमाणे माझया खोलीत अभ्यास करत होतो. बाबा बैठकीतल्या पलंगावर पहुडले होते. आई नुकतेच तिचे स्वैपाक घरातले काम आटपून खाटेवर पडली होती. मी अभ्यासात गुंग होतो. बाहेर कुणाचे तरी हुंदके ऐकू येत होते. मला पहिले वाटले की मला भास झाला असावा. थोड्या वेळाने आईची हाक ऐकु आली.

“प्रसाद…प्रसाद…अरे हे बघ ना कसे करताय”

मला पहिले कळलेच नाही काय झाले आहे ते. बाबांना नेहमी पित्ताचा त्रास होत असतो. मला वाटले की आज पुन्हा काही त्रास होतोय, म्हणून मी लगेच बैठकीत धाव घेतली.

मी बैठकीतले दृश्य बघून हबकलोच. ...
पुढे वाचा. : अश्रूंची ठेच…