बहर,
गझल आवडली. काही शेरांमध्ये मिलिंद म्हणतात त्याप्रमाणे 'आली' ही रदीफ वापरताना ओढाताण झाली आहे असं मलाही वाटलं. पण वात-अग्निदिव्य आणि दुःखे वळून आली या कल्पना विशेष आवडल्या.

संजय/गंगाधरसुत,
गझलेचे एकाच विषयावर आधारित किंवा अनेक विषयांवर आधारित असे दोन्ही प्रकार आहेत. किंबहुना अनेक विषयांवर आधारित गझल जास्त प्रचलित आहे (कारण एकाच विषयावर आधारित कवितांचे अनेक इतर प्रकार आहेतच. )
मला स्वतःला हे दोन्ही प्रकार आवडतात. त्यामुळे कविता विस्कळित होते असं मला तरी वाटत नाही.

- कुमार