मेघनाद,
तुम्ही मांडलेले मुद्दे आवडले. हे सगळंच अतिशय लाजिरवाणं आहे.
'आपण तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे संपन्न आहोत'.. अगदी खरं आहे.
बाहेरच्या जगाचा आपल्याकडे बघायचा दृष्टीकोण बदलू नये म्हणून बहुधा आपण हे असं सुमार दर्जाचं आतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवतो आहोत (देशाला आर्थिकदृष्ट्या गरज नसतानाही. ) एका दृष्टीनं तेही बरंच/योग्यच आहे. तथाकथित 'प्रगत' जगाला भारत हा 'अविकसित' देश आहे या भ्रमात ठेवून आपलं तंत्रज्ञान प्रगत करण्याच्या योजनेचा हा एक भाग असावा

- कुमार
ता. क.
मला राष्ट्रकुल स्पर्धेतल्या गलथान कारभाराचं अजिबात समर्थन करायचं नाहीये; पण या प्रगत देशांतही सगळंच उत्तम आहे असं अजिबात नाही.
नुकतीच पोपनं इंग्लंडला भेट दिली. त्याच्या एका सहकाऱ्यानं लंडन हिथ्रो विमानतळावर आल्यावर 'थर्ड वर्ल्ड' देशांतल्या विमानतळावर आल्यासारखं वाटतं अशी टिप्पण्णी केली. (त्यांनी बहुधा बंगलोर, हैदराबाद हे विमानतळ बघितले नसावेत.

)...
लंडन अंडरग्राउंड १०० हून अधिक वर्षं जुनी आहे; पण लंडन अंडरग्राउंडनं प्रवासकेल्यावर दिल्ली मेट्रो किती सरस आहे हे लक्षात येतं.