माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
“बास्स... आज मागायचंच”, मावळतीच्या संधीप्रकाशाने चकाकणार्या शिखराकडे पहात तो पुटपुटला.
“खूप सोसलं, खूप भक्ती केली. आर्जवाचे कितीतरी अश्रू ढाळले.” त्याने एक मोठा श्वास घेतला, “या मंदीराचा लौकीक मोठा आहे. इथे कितीतरी अभागी जीव येतात – काय काय व्यथा घेऊन. आतमध्ये उभा असलेला तो विश्वेश्वर प्रत्येकाच्या जखमेवर फुंकर घालण्याचं काम शतकानुशतके करतो आहे म्हणे !!”
ही पायवाट त्याच्या अत्यंत ओळखीची. पहिल्यांदा तो इथे आला तेंव्हा किती हरखून गेला होता. भक्तीभाव शीगेला आणि डोळ्यात प्रेम साठवून घेतलेलं ते दर्शन. काही न बोलता, मूकपणे कितीतरी वेळ ...
पुढे वाचा. : मागणे हे एक.....