मित्रांनो अनेक आभार

मिलिंद :  स्वप्नं हा स्वप्ने चा अपभ्रंश होत असल्याने लिहायच्या द्रूष्टीने बघितले तर वृत्तभंग होत आहे हे कबूल... पण म्हणताना त्याचा उच्चार स्वप्न सारखाच होत असल्याने लयीत बसते म्हणून सूट घेतली... शेर सोडून द्यायचा नव्हता ह्या एका गोष्टीमुळे...

चैतन्य : तुमच्या सुचवणीमुळे वृत्तभंग कसा टळतो हे स्मजले नाही.. मुळात वरची ओळ कितिही बदलली तरी खालच्या ओळित साकळायची हे रूप असेल तर स्वप्नं तसेच राहिल... 'स्वप्न' केले तर ते साकळायचे असे होईल

पण तुम्ही वापरलेला मेख शब्द आवडला... अर्थछटा थोडी बदलते त्यामुळे

संजय : तुमच्या प्रेमळ सुचना चांगल्या आहेत... अवस व्हायची अशी ह्यावर विचार करतो.. पण बाकीच्या सुचना नम्रपणे नाकारत आहे.. त्यांच्यामुळे काही ठिकाणी सहजता जाते आहे असे मला वाटते...  कृपया रागवू नये