....' विषय नीट समजून घेणे हाच हे प्रश्न विचारण्या मागचा उद्देश आहे '

हे जर खरं असेल तर हा प्रयोग करून बघा आणि तुमचा अनुभव प्रतिसाद म्हणून लिहा. माझ्या मित्रांनी माझ्याशी हजारो वेळा या विषयावर चर्चा केली आहे पण एकानं ही रिस्क घेतली नाही.  मला चर्चेत अजिबात स्वारस्य नाही कारण धाडस तुम्हाला करायचंय, मी जे केलेलं आहे ते सांगतोयं.

तुम्ही मन मानेल तसा खर्च रोजच्या वास्तविक प्रसंगात करत रहा, (नीट वाचा, 'वास्तविक प्रसंगात'), काल्पनिक, मनानी निर्माण केलेल्या प्रसंगात नाही. म्हणजे तुम्ही भाजी घ्यायला गेलात तर  तुम्हाला आवडते ती सर्वोत्तम भाजी (भाव वगैरे न बघता) पण नक्की जरूर असेल तेवढी आणि आज लागेल एवढी भाजी घ्या. जेव्हा आपण कॉंप्रमाईज करतो तेव्हा पैसे वाचलेले नसतात तर झालेला खर्च वाया गेलेला असतो कारण खर्च करून मजाच आलेली नसते.

हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला आवडेल ती बेस्ट रेसिपी मागवा. बूट घ्यायला गेलात तर अत्यंत चांगले आणि चालायला आरामशीर असेच बूट घ्या, किंमतीकडे बघू नका. कपडे घेतांना पहिल्यांदा आवश्यकता आहे का ते पहा, मग आधी रेंज ठरवू नका, सरळ तुम्हाला आवडेल ते कपडे सेल्समनला दाखवायला सांगा. ते ट्राय करून, कसं वाटतंय काय फिल येतोयं ते बघा आणि तुम्हाला मस्त वाटत असेल तर बिनधास्तं घेऊन टाका.

रोज रात्री फक्त एक गोष्ट करा; दिवसभरात झालेला खर्च लिहून ठेवा. हे लिहिणं मात्र रोज ठेवा, असं महिनाभर करा. 

महिनाभरानी इथे प्रतिसाद लिहा, तेव्हा तुमच्या लक्षात आलेलं असेल खरा, वास्तविक खर्च, नेहमी आपल्या आवक्यात असतो आणि आपण मनमुराद जगू शकतो पण कल्पनिक खर्च (उद्या असं झालं तर काय? आहे ते संपवलं तर म्हातारपणी काय? ) नेहमी दहशत निर्माण करतो. तुम्हाला मुक्त जगू देत नाही कारण मन हेच भय आहे आणि उद्या फक्त मनात आहे.

तुमच्या हे लक्षात आलं की मग रोज एकच दिवस आहे आणि तो म्हणजे आज! मग वय काहीही असो बिनधास्तपणा कायम राहील आणि म्हातारपण सुद्धा सुखाचं करील. 

मी वीस वर्षापूर्वी एकदाच पैसे मोजले आणि नंतर आजतागायत कधीही मोजले नाही. फक्त समोरचा प्रसंग आणि उपलब्ध पैसा याची सांगड घालत जगतो. मी स्वतः  सी ए असून कधीही पैसे मोजत नाही की पुढची सोय म्हणून कुठे लावत नाही. तुम्हीही करून बघा!

संजय