या कवितेविषयी बराच घोळ घातला गेला आहे. याला कारण जितेंद्र जोशी नावाच्या कुणा गायकाने या कवितेचे मूळ सांगतांना बर्याच थापा मारल्या आहेत. ही कविता मुळात नारायण सुर्वे यांची नाहीच. ती हिंदीतून अनुवादीत झालेली कविताही नाही. मराठवाड्यातल्या स.द.पाचपोळ(रा.हिंगोली) नावाच्या कवीचे हे गाणे आहे. डिसेंबर २००५ च्या धुळे येथील विद्रोही साहित्य संमेलनात हे गाणे विद्रोही शाहीरी जलसा या कलापथकाने सादर केले. त्या नंतर हे गाणे दक्षिण महाराष्ट्रात खुपच लोकप्रिय झाले. हे एक लोकप्रिय लोकगीत बनल्याने याच्या कॉपीराईट इ. विषयी कोणी फारशी काळजी घेतली नाही. आता काही गायक हे गाणे चोरून त्याच्या सिडीज बनवित आहेत पण दुर्दैवाने या गाण्याच्या मूळ निर्मात्यांना याचे श्रेय देण्याचे बेमालून टाळले जात आहे. असल्या उठवळ व उचल्या लोकांपासून मराठी ब्लॉगवाल्यांनी सावध रहायला हवे. नाहीतर मराठी साहित्याचा सारा इतिहासच खोटा लिहीला जाईल.
अविनाश कदम, मुंबईसेंट्रल, मुंबई