मी ही काही कर्म कांडी नाही कुळात जन्माला आलो व्रतबंध झाला म्हणून मलाही ब्राम्हण हि संज्ञा प्राप्त झाली एवढेच काय ते! बाकी मी माझ्या पुरती कुवती प्रमाणे विषय मांडतो आपल्या आवडला तर ठेवा अन्यथा....
प्रत्येक धर्म आणि त्याचे संस्कार हे ठरलेले असतात. धर्म हा वेड्यांचा नसून समाजजिवनाला सुसंस्कारीत करून समाज घट्ट एकजिव बांधून ठेवण्यासाठी आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. माणुस जन्म घेतो तेंव्हा तो कोणत्या धर्माचा असतो ? कोणीही ह्याचे उत्तर देऊ शकणार नाही तरी पण, तो ज्या धर्मातील आई बापांच्या पोटी जन्माला येतो तो त्याचा धर्म असे आपण ढोबळ मानाने गृहितच धरतो आणि हे असच चालत आलेले आहे. आज जन्मताच त्याची जात धर्म लगेच सरकारी दरबारी नोंदवली जाते. येथे मला धर्माचा वाद किंवा आणखीन काहीबखेडा उभा करायचा नाही हे प्रथमतः लक्षात घ्या.
प्रत्येक धर्मात आपल्या आपल्या बांधवांवर घडविण्याचे विशिष्ट संस्कार असतात. जसे बाप्तिसमा, सुनता, नामकरण, हे माझ्या माहीतीतले ह्याही पेक्षा अधिक असतात पण मी अपुरा आहे. आपल्या बद्दल बोलायचे झाल्यास आपल्यात सोळा संस्कार दिलेले आहेत ह्या विषयी विस्तार भयामुळे आटोपते घेतो . मुळ मुद्दा असा की मुंज झाल्याशिवाय त्या व्यक्तीस अध्ययनाचा अधिकार प्राप्त होत नाही . हे जे आपण शालेय शिक्षण घेतो ती ही पोट भरायचे शिक्षण आहे आणि त्यासाठी आपण आपल्या बालकांचे बालपण हिरावून घेवून वयाच्या अवघ्या अडीच ते तीन वर्षातधावायला लावतो. पण पुर्वीचा अध्ययन काळ हा वयाच्या ८ ते १२ वर्षाच्या तुलनेत सुरू व्हायचा आणि त्या काळात बालकास पोटभरायच्या ज्ञानाबरोबर अध्यात्म शिकवल जायच तस आज नाही . त्या काळात कर्मावर वर्ण ठरविले जात आणि कोणतही काम कमी लेखल जात नसे प्रत्येक वर्णांनी आपले उपजिविकेच हक्क शाबूत राखण्यासाठी प्रत्येकाने वर्ण व्यवस्था अधिक बळकट केली नाही तर क्षत्रियकुलोत्पन्नचा ब्रम्हर्षी विश्वामीत्र कसा झाला असता? तर असो...
आपण मुळ मुद् कडे वळू हे सगळ होऊ शकले ते फक्त संस्कारामुळे आणि वर लिहिल्या प्रमाणे ह्या सर्व संस्काराची उपयोग्यता घरात आणि आजच्या काळात संदर्भ आपणच लावायचा असतो नव्हे ती शोधायची असते. बघा संध्याकाळची दिवे लागणीची
वेळआहेदेवघरातील लहान मुल शुभम करोती म्हणत बसली आहे आजी पण त्यांच्या जवळ देवाच्या वाती वळत बसली आहे मुल घरच्या धन्याला उदंड आयुष्य मागताय हे चित्र आपल्या घरात नको असे कोण म्हणेल? आता मला सांगा उदंड आयुष्य मागितल्याने घरचा धनी दिर्घायुष्यी खरच होतोका ? पण हे संस्कार आपल्या घरात आपल्या सर्वांनाच हवे असतात म्हणून ते आपणच घडवतो ना? .
आता थोड सामाजिक संदर्भाकडे वळू या एक तिस वर्ष माघचा काळ जर बघितला तर त्या काळात आई वडिलांसाठी आधाराश्रम कीती होते आणि आता कीती आहेत? ह्याचा अभ्यास करा. आणि ह्या उपर प्राण्यांवर कधी कोणी कोणत्या धर्मात संस्कार केल्याचेऐकीवात आहे का ? फार तर फार बळी देतांना पुरोहित वर्ग मंत्रोच्चार करून बली देणाऱ्यास बली द्यायला लावतात पण त्यांचे नामकरण सुंता,लग्न असे प्रकार तर कधी कानावर आलेले नाहीत. आणि ह्या त अजून एक ............