शक्यता काहीही असली तरी काही बाबतीत धोका न पत्करणंच इष्ट असतं. लष्करी तळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर मुळीच नाही. याचं भान त्या युवतीनी ठेवलं. तो मनुष्य अधिकृत असता तर तिला कळवलं गेलंच असतं. आणि जर तसं कळवलं गेलं नसतं तर तो मनुष्य तालिबानी नसता तरी तिला कोणी दोष दिला नसता.
आपल्याच इतिहासतलं उदाहरण घ्यायचं झालं तर हिरकणीला अंधार पडल्यानंतर शिवाजी महाराजांच्या गडावरून उतरू देण्यात आलं नव्हतं. तिला उडी मारावी लागली होती. तसं पुन्हा कोणाला करता येऊ नये म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी बुरुज (टेहेळणी मनोरा) बांधला जो हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो.
एखाद्या गोष्टीवर सर्वांगीण विचार करणं वेगळं नि तिला फाटे फोडणं वेगळं. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत फाटे फोडणं धोक्याचं ठरू शकतं. मला वाटतं वरील लेख आपल्याकडच्या फाटे फोडण्याच्या अतिरेकी प्रवृत्तीविरुद्ध आहे.