"हल्ली एकूणच सेल्फ हेल्प म्हणतात तशा प्रकारची चिकार इंग्रजी पुस्तके लोक वाचतात आणि त्यांना अचानक ज्ञानप्राप्ती झाल्यासारखी वाटायला लागते. आपापल्या वकुबाप्रमाणे त्याचा अर्थ लावून ते इतरांना शहाणे करायला धडपडतात. मजेत जगावं कसं, माणसे जोडावी कशी, जीवन आनंदी कसं करावं, इत्यादी. "
१) इथे मला एक नमूद करावंस वाटतं की मी सी ए आहे, पैसा हा माझा हातखंडा विषय आहे, अचानक ज्ञानप्राप्ती नाही, अत्यंत सखोल अभ्यास आहे
२) मला इतरांना शहाणं करण्यात स्वारस्य नाही, तुम्हाला हवं तर घ्या नाहीतर सोडून द्या, कोणती जबरदस्ती आहे?
३) इथे उपहासात्मक प्रतिसाद देण्यापेक्षा तुम्हाला पैसा काय समजला आहे ते लिहा म्हणजे सर्वंना तुमची समज कळेल.
४) माझं सर्व लेखन माझं आहे, पण प्रतिसाद देतांना तुम्ही बहिणाबाईंचा आधार घेतला आहे:
.. "त्यावरून एक गोष्ट आठवली. बहिणाबाई एकदा कीर्तनाला गेल्या. काही वेळ गेल्यानंतर त्या कीर्तनकाराला म्हणाल्या, 'नामा म्हने तुका म्हने ते सगळं ठीक आहे, पन भल्या मान्सा, तू काय म्हने ते सांग की कवातरी! '
इतपत जरी तुम्हाला कळलं तरी विषय वैयक्तिक न होता विधायक होऊ शकेल आणि तुम्हाला नाही झाला तरी इतरांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

संजय