रंजयति इति रागः हे संगीतातल्या रागालाच लागू होत हे अगदी बरोबर. मी एका विदुषीला विचारले तेव्हा त्याचा अर्थ  चित्ताला रंगवतो तो राग अभिप्रेत आहे असे सांगितले.

सुमार हा शब्द शुमार ह्या अरबी-फ़ार्सी शब्दापासून आला आहे. शुमार म्हणजे गिणती. वाक्यात उपयोग उनका शुमार बड़े फ़नकारों में होता है. बेशुमार म्हणजे मोजता येत नाही असे. जसे, बेशुमार दौलत या शोहरत.

यावरून मराठीतल्या सुमार वापराचा अंदाज यावा.

चित्तरंजन