प्रस्तुत लेख वस्तुस्थितीला समर्पकपणे ताडतो, ही गोष्ट मान्य; पण कॅनडामध्ये घडलेल्या एका घटनेवरून आपण आपल्या राष्ट्रीय मानसिकतेवर टीका करून नक्की काय साध्य करतो आहोत?
एका सार्वभौम आणि लोकशाही राष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटनांचे विविध प्रतिसाद उमटणं सहाजिक आहे. हान! आता, ते प्रतिसाद देणारे नेते स्वार्थी, अप्पलपोटी आणि समाजकंटक आहेत, या गोष्टीला आपण नागरिकच जबाबदार नव्हे का?
घरातील निर्णय जरी कर्ता पुरुष घेत असला, तरी त्या निर्णयांवर घरातील सर्वांच्या विचारांचा, गरजांचा आणि मतांचा पगडा असतो. जर कुटुंबातील सभासद अलिप्त राहिले, तर कर्त्या पुरुषाचा निर्णय हा निस्वार्थी असण्याची शक्यता खचितच उद्भवेल!
कदाचित... हेच आपल्या देशाचं सध्याचं चित्र आहे.
राजकारणी हे समाजाच्या नाकर्तेपणामुळे स्वर्थीपणे वागतात आणि वरील लेखामध्ये नमूद केलेले तर्क वस्तुस्थितीत उतरतात.

असो... आपल्या लेखावर टीका करण्याचा माझा मनसुबा नव्हता. फक्त, 'आपलंच नाणं खोटं' असा युक्तीवाद दुसऱ्याकडे बोट दाखवल्यासारखा केला जाऊ नये, एवढी नम्र इच्छा.

कोणताही गैरसमज करून घेतला जाऊ नये.

आपला नम्र...