माणसाच्या पैशाविषयीच्या मोहाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. जी गोष्ट तुम्ही असेल तर वापरता आणि नसेल तर चिंता करत नाही ती मोह निर्माण करू शकत नाही. यू डील विथ मनी ऍज अ फॅक्ट अँड नॉट ऍज अ फिक्शन दॅट्ज द होल सिक्रेट!

तुम्हाला खरंच समज असेल तर ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे जे जन्मभर उपयोगी पडू शकेलः

ओशो म्हणतात : ज्ञानीने भोगने की कला सीख ली है, वह भाव को भी भोग लेता है और आभाव को भी!

तुम्ही व्यक्तिगत संबंधांपासून सुरूवात करा, जो समोर आहे त्याच्याशी सूर जुळवा, मग जो नाही त्याची आठवणच होत नाही!

हे एकदा जमलं की पैशाचं अगदी तसंच आहे. जर असेल तर आहे तो प्रसंग साजरा करायचा आणि नसेल तर दुसरा उत्तम पर्याय साजरा करायचा, तुमचं पैशावरचं अवलंबित्व संपलंच म्हणून समजा. बुद्धी पैशापेक्षा केंव्हाही श्रेष्ठ आहे ही खूणगाठ मनाशी ठेवा.

संजय