आपल्याकडील टेहेळणी पथकाच्या कारवाईच्या बातम्या क्वचितच प्रसिद्ध होता त. त्यामुळे
आपल्या देशाची कारवाई कळणं कठीण आहे. मला तर असं वाटतं , कॅनडामधले लोक एकाच दिशेने विचार करणारे आहेत. या उलट आपल्याकडे
कोणत्याही घटनेवरील(फ़क्त) प्रतिक्रिया विविध अंगांनी प्रकट होतात. यात नवीन भरही घालता येईल.तसच कॅनडातले लोक आपल्या पेक्षा जास्त
दक्ष (व्हिजिलंट)आहेत. ते आपापल्या क्षमतेप्रमाणे कारवाई करण्याचे धाडसही करतात.   आपलया कडे मात्र लोक चर्चांशिवाय काहिही करीत
नाहीत. हा आपल्याकडील समाज व्यवस्थेचा दोष  आहे असं म्हणून आपण त्यामागे लपू शकतो. मग कारवाई कशी करणार ? अशा समाजाने
निवडून  दिलेले नेते पण तसेच असणार हे उघड आहे. या घटनेचे आणखीही अर्थ कोणी काढू शकेल.  असो. बऱ्याच दिवसांनी  असा
संतुलित लेख वाचला. प्रस्तुत लेखकाने कोठेही चांगलं, वाईट , बरोबर , चूक अशी  शेरेबाजी ही केलेली नाही.      पु̮ . ले. शु.