ते असे:
१) हिशेब म्हणून डायरी लिहिणे, तुम्ही म्हणता तसे जवळजवळ सर्व डायरी लिहिणारे याच उद्देशानी डायरी लिहितात. हे काम अत्यंत निरर्थक आहे कारण खर्च लिहून पैसे मिळत नाहीत आणि तुम्ही म्हणता तसा आठवायचा त्रास होतो. ज्या वेळी मी सी ए ची डिग्री घेतली त्याच वेळी मला ही निरर्थकता लक्षात आली. बिझीनेस अकौंटस ही कायदेशीर तरतूदींची पूर्तता करण्यासाठी लागणारी अत्यावशक बाब आहे आणि त्याला पर्याय नाही पण इथे तो विषय नाही.
२) मी जो खर्च लिहिण्याचा उपाय सांगीतला आहे तो फार वेगळा आहे. तुम्ही एक साधा कागद खिशात ठेवू शकता आणि खर्च झाल्यावर तिथे लिहू शकता, हिशेब जुळवणे हा त्या कागदाचा हेतू नाही, फक्त नोंद! मग असे महिनाभराचे कागद तुम्ही एकत्र केले आणि तुमच्या महिना भरातल्या आर्थिक उलाढालीची पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल की मनसोक्त खर्च करून देखील जरूर तेवढा पैसा नेमक्या प्रसंगी उपलब्ध होता!
तुम्ही पैशाच्या काल्पनिक अडचणीतून बाहेर पडू शकाल कारण पैशाची सगळी मोहिनी भविष्यकालीन कल्पनांमुळे आहे.
संजय