उत्तरासाठी धन्यवाद.

वरील प्रयोग मी गेली काही वर्षे (आर्थिक सुस्थिती आल्यापासून) करीत आहे. हे मी , प्रयोग न करता , तुमच्याकडून लगेच उत्तर हवे म्हणून लिहीत नाही आहे. माझ्या मनात पुर्वी पासूनच चांगल्या वस्तू साठी आकर्षण आहे आणि ते मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आज पर्यंत असा खर्च केल्याचा मला कधीच पश्चात्ताप झालेला नाही तर आनंदच झालेला आहे.

तरीही भविष्या बद्दल चे विचार जसे , वाढते वय, त्या बरोबर येणारे आजारापण, त्या साठी जमा करावयाची पुंजी हे येतच असतात.