माझा आवडता खेळ ‘भ्रष्टाचार’. कारण, हा खेळ एकट्याने आणि सांघिक अशा दोन्ही पद्धतीने खेळता येतो. भ्रष्टाचार हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. माझ्या देशात हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आताच होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी आमच्या सुरेशने हा खेळ खेळून जगभर त्यांचा नावलौकिक कमावला. या खेळातील ‘मास्तर ब्लास्टर’ तोच आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण मला गारद गवार हा खेळाडू खूप आवडतो. तोच या खेळाचा खरा ब्रॅडमन आहेत.

माफ करा मला लिंक देणे येत नाही. एका मराठी ब्लाग वर वाचले.