याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे, मराठी माध्यमात जाणारी बहुतेक मुले अभ्यासात मंद असतात म्हणून तिकडे जातात, मराठीवरील प्रेमाने नाही. (आपल्यासारखे जाणीवपूर्वक मुलांना मराठीला पाठवणारे फ़ारच थोडे पालक असतिल).
त्यांचा मुळात अभ्यासच यथातथाच असल्यामुळे त्याचेच प्रतिबिंब पेपरात पडणार. शिक्षकांचाही हाच प्रश्न आहे. मराठी शाळाच मुळात कमी, त्यामुळे शिक्षकही कमी, आहेत त्यांच्या डोक्यावर नोकरी जाणार तर नाही ना ही टांगती तलवार. मग गुणवत्ता येणार कोठुन?
दुसरे असे की आजकाल व्याकरण शुद्ध वगेरे मराठीचा आग्रह कोणी धरत नाही. चुकिचे मराठी बोलणे हीच फ़्याशन आहे. लोकसत्ताची नवीन विवा नावाची पुरवणी पाहिलीत तरी लगेच लक्षात येईल मी काय म्हणते ते. तरुणाइची भाषा म्हणजे इंग्रजाळलेलीच असली पाहिजे असा आग्रहच असतो लोकांचा मुळी. मुलांवरही मग तेच संस्कार होतात.
तर अश्या ह्या गोंधळात मुले कुठे व्याकरण शिकणार, कोण त्यांना कविता समजवणार आणि मराठी माध्यमात जाण्या-या मुठभर मुलांसाठी कोण एवढ्या उचापत्या करणार?
आपण फ़क्त मराठीची चिंता करायची मनोगतावर बसून.
- मराठीप्रेमी साधना.