ग्रहाणू शब्दातला णू दीर्घ लिहिताना, खरे तर, हात थरथरतो.  पण ते थरथरणारे हात १९६२ च्या शुद्धलेखनाच्या नियमांनी बांधले गेले आहेत. याच नियमांनी 'गुरु'ला गुरू(चार पायाचे दुभते जनावर) आणि आदि‌ शंकराचार्यांना आदी(व्यसनी) शंकराचार्य केले आहे.


पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय या खात्यांच्या महाराष्ट्राच्या (सध्याच्या) मंत्र्याला अधूनमधून शिक्षणखात्याकडेही लक्ष द्यायला सांगितले की गुरूंना गुरांप्रमाणे वागणूक मिळत राहिली तर आश्चर्य नाही.  महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात प्रांताला पूर्णवेळ शिक्षणमंत्री मिळालेला नाही, असे ऐकून आहे.

प्लॅनेटेसिमल मधल्या एस् चा उच्चार स करावा असे मला वाटते. इंग्रजीमधल्या क, थ, प, फ़, ट(फ़ुटकाथुटका कप)  यांच्या पुढेमागे एस् आला की त्याचा उच्चार स होतो, अन्यथा ज़‌(झ), असा अनुभव आहे.(अपवाद आहेत, पण फार थोडे!)  त्यामुळे मराठीत लिहिलेल्या गर्ल्स, गन्स, क्लासेस्  वगैरे शब्दांचे लिखाण गर्ल्ज़‌, गन्ज़, क्लासिज़ असे व्हायला पाहिजे.

मराठी भाषकांचा लोकानुनय करायचा नसेल तर प्रस्तुत शब्द प्लॅनेटेसिमल्झ असा लिहिता आला तर पहावे.