माझे वडिल कित्येक दशके झाली, रोजनिशी लिहीतात. तुटपुंजी मिळकत असण्याच्या कालखंडात ती अधिक परिणामकारकपणे वापरत असत. 'इझी गो लकी' राहण्यासारखी तेव्हा परिस्थितीच नव्हती. आता रोजनिशी लिहिणे हा त्यांचा एक छंद/ सवय म्हणता येईल. या सवयीमुळे त्याना मनस्ताप झालेला कधी दिसला नाही. अत्यंत ओढगस्तीच्या परिस्थितीतही या हिशेबी वृत्तीच्या जोरावरच ते सगळ्या जबाबदार्या निभावू शकले असावेत असे वाटते. त्यामुळे त्यांच्या या सवयीकडे मी आदरानेच बघतो.

या उलट मी तसा 'इझी गो लकी' वाला, आजतागायत रोजनिशी लिहिलेली नाही. काटेकोरपणा फारसा नसला, तरी त्रासदायक ठरणार नाहीत अशी  'टारगेट' ठेऊन ठराविक  बचत/ विम्यात गुंतवणूक मात्र करतो. यात माझे वडिलच मदत करतात. कुणालाही सहज पटेल असे धोरण आखून देतात. पत्नीचे सिझेरियन करावे लागणे, मुलांच्या शाळेतल्या प्रवेशासाठी 'वास्तू विकास निधी' वगैरे द्यावा लागणे, पुढे उच्च शिक्षणासाठी येणारे खर्च हे सारे लक्षात घेता आपापल्या परीने जो तो नजिकच्या काळासाठी आणि दीर्घ मुदतीचे थोडेफार तरी आर्थिक नियोजन करतच असतो आणि तेच योग्य आहे.

एकंदर मिळकत आणि अंगावर असणार्या जबाबदर्या  यामधील सम/ व्यस्त प्रमाण आणि त्यानुसार घडणारी रोजनिशी लिहीणार्याची वृत्ती, त्याचा काटेकोरपणा यावर तिची उपयुक्तता/ आवश्यकता ठरते असे माझे निरीक्षण आणि अनुभवही आहे.  

(संपादित : प्रशासक)