गैरसमज आपला झाला आहे. मजेत जगावं कसं आणि माणसे जोडावी कशी ही शिवराज गोर्ले यांच्या पुस्तकांची नावे आहेत.
बहिणाबाईंच्या प्रसंगात नामा आणि तुका याच्याऐवजी एकहार्ट आणि ओशो ही नावे घालावीत म्हणजे मी काय म्हणतो आहे ते कळेल.
बाकी प्रसंग आणि पैसा यांची सांगड घालण्याची कल्पना चांगली आहे पण मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोकांसाठी. निम्न आर्थिक परिस्थितीतले लोक किंवा अकुशल कामगार म्हणजेच पर्यायाने ज्यांना पैशाची नियमित आवक नाही, ते हा प्रयोग करायला गेले तर पंचाईत होईल. तसेच व्यसनी लोक जर आला प्रसंग (दारू पिणे किंवा जुगार खेळणे) आणि असलेला पैसा यांची सांगड घालू गेले तरीही काही खरे नाही.