१०-१२ रुपयांची बेहिशेबी रोकड आपल्याजवळ राहिल्याने आपली झोप उडाली दाढी करायची राहून गेली आणि पुढे ताप वगैरे आला (जाता जाता हे सांगावेसे वाटते, कि मलेरिया केवळ विशिष्ट डासाच्या चावण्यामुळेच होतो असे आम्ही समजत होतो. पण मानसीक ताणातून मलेरिया होणे कधी ऐकले नव्हते. बरं, त्यामुळे ताप नव्हता आला म्हणावे तर त्याचा या विषयाशी संदर्भ काय हे कळत नाही) असो, स्वतःचेच १०-१२ रुपये होते ना ते? मग आले थोडेसे जास्त, तर एव्हढा ताप करून घेण्याचे कारण काय? एक मात्र बरे झाले, कि १०-१२ रुपये अधीक आले. कमी आले असते तर?????? बापरे, कल्पनाच करवत नाही! एखाद्याला नैराश्य किंवा हृदयविकाराचा झटका देखिल येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काळजी घ्या...
बाकी सगळे ठीक आहे, पण घरमालक दयाळू होते म्हणजे काय ते नाही समजले. घरमालक दयाळू होते, त्यांनी सगळे ऐकून घेतले आणि शांतपणे म्हणाले, " म्हणजे, दयाळू नसलेल्या एखाद्या घरमालकाने नक्की काय केले असते?
अजून एक गोष्ट - घरमालक म्हणाले... ती म्हण या संदर्भात वापरणे चुकिचे आहे (म्हणितला एक शब्द देखिल चुकिचा आहे... यमक साधून मस्तपैकी 'जेणू काम तेनू थाय, बिज करे सो गोत खाय' अशी म्हण आहे ती!!) .शिवाय, माझ्या माहितिप्रमाणे... उदाहरणार्थ सुताराने करण्याचे एखादे छोटेसे काम आपले आपणच करायला गेलो आणि काम बिघडणे आणि / किंवा काम करताना आपल्याला काही दुखापत होणे वगैरे असे काही तरी झाल्यास त्या माणसाला 'जेणू काम तेणू थाय , बिजा करे तो गोता खाय' असे ऐकवतात. आता या उदाहरणात जे काम आपले नाही, सुताराचे आहे ते त्यानेच करावे - आपण नाही... असा अर्थ लावता येइल. पण आपल्या बाबतीत घरमालकाने दयाळुपणे चुकिची म्हण वापरून आपल्याला हे समजावले की रोजनिशी लिहिणे हे आपले काम नाही, कुणा दुसऱ्याचे काम आहे??? आणि आपल्याला ते पटले???
असो, माझा समजुतीत / माहितीत काही चुक असल्यास कळवावे..