गुजराथी आहे. त्यामुळे शब्द चुकला. क्षमस्व.
हा किस्सा १० वर्षांपुर्वीचा आहे. त्यावेळच्या वयानुसार शिस्त, वेळ पाळणे (अगदी मिनिट टु मिनिट), वगैरे गुण अंगात होते. जे काम करायचे ते १००% पर्फेक्ट झालेच पाहिजे, अशी अपेक्षा असायची. त्यामुळे १२ रुपये उरले, म्हणजे कुठेतरी हिशोबात गडबड झाली, हे मनाला पटले नव्हते. आणि आपण चुकू शकतो, ही बोच मनाला लागली असावी, असे वाटते.
मुंबईत कोणाला कोणाचे ऐकून घ्यायला वेळच नव्हता. त्यात भाडेकरू आजारी पडला (तो ही विद्यार्थी) तर पुढच्या महिन्याचे भाडे वेळेवर मिळेल की नाही, अशी चिंता करणारे, घरमालक कमी नाहीत. त्यांनी ऐकून घेतले आणि अमजावून सांगितले, हे माझ्यासाठी खुप मोठे काम होते.
एखादी गोष्ट कित्येक वर्ष न पटून सवय झालेली असते, पण ती एखाद्या छोट्याश्या प्रसंगातून कळते आणि वळते. तसच काहिसं माझं झालं असावं.
मलेरिया डासांमुळे होतो, हे अगदी बरोबर आहे. आणि मला डासांमुळेच मलेरिया झाला, पण "त्यामुळे मलेरिया झाला" असं मी लिहिलेलं नाही.
पण आता मी विचार करू लागलो की १२ रुपये आले कुठून? ३-४ दिवस त्या विचारांमुळे दाढी करणे विसरलो. झोपही अपुरी होत होती. खाण्यावर लक्ष लागत नव्हते, अन त्यातच मलेरिया झाला. मग काय? डॉक्टर, औषधं....
म्हणण्याचा अर्थ असा की मलेरिया झाल्यामुळे झालेला खर्च लिहून ठेवणे शक्य झाले नाही. कदाचित शब्द तुमच्या नजरेतून सुटला असेल. असो.
तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि "म्हण" सुधारल्याबद्दल धन्यवाद. म्हणीतील चुक नंतरच्या प्रतिसादात पुन्हा दुरुस्त केली असली तरी त्याबद्दलचे आभार याच प्रतिसादात देत आहो.