या नव्या पिढीला या वादांमध्ये रस आहे का?

माझ्या मते हा प्रश्न बरोबर आहे. प्रत्येक पिढीनुसार वादाचे विषय बदलत जातात आणि ते स्वाभाविक वाटते. नव्या पिढीबद्दल, जी बहुराष्ट्रीय कंपन्यांत काम करते, तिला

१. वेळ नाही. दळणवळणाची साधने वाढली पण कामावरून येण्याची वेळ लांबली.

२. जुन्या काळात मनोरंजनाची साधने कमी होती, त्यामुळे वाद-विवाद, चर्चा यात आनंद घेतला जायचा. आता स्वतःचेच टेन्शन इतके आहे की कशाला हवीत ती लफडी असं म्हटल्या जाते

३.  सध्याच्या पिढीसमोर बऱ्याचशा नवीन समस्या आहेत, त्यातून डोके काढायला त्यांना फुरसत नाही.

४. अज्ञान :- कित्येकांना सीमा प्रश्न, शिवाजी महाराजांचे गुरु, अयोध्या, वगैरे प्रश्नांची फारशी माहिती नाही (मलाही फारशी नाही)आणि ती करून दिल्या जात नाही किंवा करून घेण्याची इच्छा नाही.

सोशल कम्युनिटीवर १% तरून तरुणी लिहीत असतील. त्यावरून निष्कर्ष काढणे मला तरी योग्य वाटत नाही.

खरं तर या सगळ्यांना नाईलाज आहे. बघा पटतं का.