... "लेख आवडला... विचार अगदी पटले, विशेषतः तुम्ही दिलेली चार कारणे. "
......... 'कधी उद्या येतच नाही' हा विचार नवीन आहे, विचार करायला लावणारा. "
ही वस्तुस्थिती आहे. नेहेमी आणि सदैव जगायला एकच दिवस आहे तो म्हणजे आज!
तुम्हाला पटलं असेल तर माझ्यासाठी फक्त एक करा कुणाला पटवून द्यायचा प्रयत्न करू नका कारण लोक तुम्हाला हैराण करतील. तुम्ही फक्त या अनुभवात रमा, किती मोकळं वाटतं ते बघा, सगळं किती सोपं होतं याची मजा घ्या. एक दिवस तुमचा बोध आणि तुमचं वागणं एकरुप होईल, तुम्हाला कळेल की खरंच एकच वस्तुस्थिती आहे आणि ती म्हणजे हा क्षण! सगळं घडतं, आठवतं, करता येतं ते फक्त याच क्षणात! मग कोणी काय वाट्टेल ते म्हणो तुम्हाला फरक पडणार नाही! सत्य आणि हा क्षण दोन्ही एकाच वस्तुस्थितीची दोन नांव आहेत, मग आपण आणि हा क्षण यात काही अंतर उरत नाही, पण तोपर्यंत चर्चेत अजिबात पडू नका! (इथे मी या एका गोष्टीवर तीस लेख लिहिलेत पण पब्लिक ऐकेल तर शप्पत! )
संजय