संजयजी नमस्कार,
तुमचे लेख वाचून मी फारच भारावलो आहे. अशा प्रकारचे वाचन मी पूर्वी केलेले नाही. ज्ञानेश्वरी व त्यावरील लेखन वाचून अध्यात्म समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच हे लेख वाचण्याची संधी मला मिळाली. कदाचित/ नक्कीच हे असेच ठरलेले असेल.
या लेखातील एका वाक्याचा मला समजलेला अर्थ मी खाली देत आहे. कृपया मी चूक आहे की बरोबर हे समजावून सांगावे. (माझ्या अल्प ज्ञानामुळे ते शक्य असल्यास. )
वाक्य : फरक फक्त एकच आहे माणूस सोडून कुणालाही त्या वैश्विक बुद्धिमत्तेच्या विरुद्ध जाण्याचं स्वातंत्र्य नाहीये.

मला वाटत की तुम्हाला येथे माणसाला वैश्विक बुद्धिमत्तेच्या प्रवाहाची दिशा किंवा प्रवाह जाणण्याचे सामर्थ्य आहे जे इतर प्राण्यांमध्ये नाही असे म्हणायचे आहे. मला वाटत की जर माणूस त्या वैश्विक बुद्धिमत्तेचाच एक अंश असल्याने त्याच्या विरुद्ध जाण्याचे स्वातंत्र्य माणसांना तरी कसे असू शकते. ते अनुभवायचे स्वातंत्र्य मात्र असू शकते.

"आणि म्हणूनच माणसाला अस्तित्वाशी लयबद्ध होण्याची अपरिमित मजा ही कळण्याचा पर्याय खुला आहे. "
आपला एक नम्र वाचक.