वादांबद्दल लिहायचे झाले तर शिवरायांचे गुरू, त्यांची जन्मतारीख इत्यादी , हे सारे वाद आहेत.

परंतु सीमा प्रश्न, काश्मीर प्रश्न हे वाद नसून  वास्तव आहेत. इतिहास संशोधनाकडे निकोप दृष्टीने पाहणे आपल्या समाजाला

शक्य नाही असे खूप वेळा दिसले आहे. ज्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा काही शतकांपासून रंगविल्या गेल्या आहेत, समाजाने

विशिष्ट मताने स्वीकारल्या आहेत व त्या तशाच पुढे लहानपणापासून शिकवल्या गेल्या आहेत, अशा समाजात त्यावरील संशोधने

प्रसिद्धच नाही केली तर बरं होईल. नाहीतर इतिहास हा विषय बंद करण्याची वेळ येईल.  नवीन पिढीला वेळ नाही हे खरच

आहे, पण त्यातिल मराठी असतील ते त्यातल्या त्यात वेळ काढून वादचर्चा करीत राहतील. कारण ते एक आपलं वैशिष्ट्य

आहे. भरल्या पोटी वाद चर्चा करायला बऱ्या वाटतात, कारण आपले त्यात फक्त शब्द खर्च होतात. स्वतः कारवाई करून

दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे व त्यावर सल्ला मसलत करणे (कोरडी चर्चा नव्हे) हे मात्र फारसे होताना

दिसत नाही. अशा चर्चा निष्प्रभ ठरतात, कारण तिथे आपल्याला काही तरी करावे लागते (अन्यायाविरुद्ध दाद मागणे, किंवा

झगडून न्याय मिळवणे) . खरं तर हा विषय  उगाळून उगाचच ताजा केला जात आहे.  अर्थातच हे माझे मत आहे. कदाचित

कोणाला पटणारही नाही.