राजू परुळेकरांचे मुद्दे तरीही एकांगी वाटतात.
केवळ मोघम विधान.   अमुक पुढाऱ्याची किंवा तमक्या अधिकाऱ्याची कार्यपद्धती योग्य नाही म्हणून त्याला बदला;   माझ्यावर होत असलेले हे आरोप बेसलेस(बिनबुडाचे-आधारहीन) आहेत; असली मोघम विधाने रोज वाचायला मिळतात. ती करणाऱ्या लोकांना,   पद्धती जर योग्य नसेल तर कोणती कार्यपद्धती योग्य हे सांगायची गरज वाटत नाही. तो अधिकारी किंवा पुढारी मला आवडत नाही, त्याची माझी पुश्तैनी दुष्मनी आहे, तो मला गैरव्यवहार करू देत नाही म्हणून त्याला बदलावे, असे सांगण्याची ही खास राजकीय रीत असते.   आरोप बेसलेस आहेत. मतलब असा की गुन्हा घडलेला आहे, तो मीच केला आहे, पण माझ्यावर तसा आरोप करणाऱ्याला कसलाही पुरावा मिळू नये याची खातरजमा मी करून घेतलेली आहे, हा मथितार्थ.

तेव्हा कोण कुठे काळे आहेत आणि कोणाचा कुठला हिस्सा गोरा आहे हे स्पष्टपणे लिहावे.   राजू परुळेकरांचे कुठले मुद्दे एकांगी आहेत त्याची जंत्री करावी. प्रत्येक मुद्द्यासमोर त्याचे दुसरे अंग काय आहे ते लिहावे.   असे केले तरच लिखाणाला काहीतरी अर्थ आहे असे समजले जाईल. नाहीपेक्षा, असली भोंगळ मते व्यक्त करू नयेत.

--अद्वैतुल्लाखान
(संपादित : प्रशासक)