लोकप्रभाच्या त्या डेअरीमध्ये एकही उत्तरप्रदेशी हिंदीभाषक भैय्या सापडला नाही. मनोगतावरच्या प्रस्तुत लेखातील नऊही मुद्दे मराठीची अवहेलना आणि उत्तरप्रदेशीयांचे लांगूलचालन यांवर आहेत. प्रवीण बर्दापूरकरांचा तो लेख आपण चर्चा करीत असलेल्या विषयासंबंधी आहे असे समजणे आणि सांगणे म्हणजे स्वतःची प्रतारणा आणि दुसऱ्याची फसवणूक केल्यासारखे आहे. कितीही दिशाभूल करायचा प्रयत्‍न केला तरी जोपर्यंत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा परामर्श घेतला जात नाही तोपर्यंत असले प्रतिसाद लिहिणे व्यर्थ आहे.