संपूर्ण अस्तित्वात निसर्ग कार्यरत आहे म्हणजे पक्षी भूक लागली की खाद्यं असेल त्या दिशेला विनासायास झेपावतो आणि रस्ता नसताना हमखास घरट्यात परत येतो. पक्षी अस्तित्वाशी एकरूप आहे पण त्याला ते माहीत नाही आणि त्यामुळे तो अस्तित्वाच्या इच्छे विरुद्ध जाण्याचा विचार देखील करू शकत नाही.
आपण सुद्धा निसर्गाशी एकरूप आहोत पण आपल्याला आपण वेगळे आहोत असं वाटतं, आपण हरप्रकारे निसर्गावर मात करून आपली मनमानी कशी चालेल हे ठरवण्याचा प्रयत्न करतो.
आपण विचारा ऐवजी जर संवेदनेनं जगू लागलो तर अस्तित्वाशी लयबद्ध होतो.
संजय